Share

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के

Published On: 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यावेळेस परीक्षेसाठी १४ लाख २० हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ८१ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. तर कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC 95.07 टक्के, निकाल लागला आहे.

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. यावेळी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे. पुणे ९२. ५० टक्के, मुंबई ८९ .३५ टक्के, कोल्हापूर ९२ .४२ टक्के, अमरावती ९२.०९ टक्के, नाशिक ८८ .८७ टक्के, लातूर ८९. ७९ टक्के, कोकण  ९५ . ८९ टक्के, नागपूर ९१.६५  टक्के, औरंगाबाद ८८ .१८ टक्के.

या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

असा पहा निकाल :
वरीलपैकी एका वेबसाईटवर जा.
वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा, आसनक्रमांक टाका.
विचारलेली योग्य माहिती द्या. (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते.)
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल.

त्याचबरोबर www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही राज्यात मुलींचीचं बाजी

मोदींच्या गुजरात मधे भाजप ‘बेहाल’

मे महिन्यातही शिक्षकांना काम, जनगणनेच्या कामासाठी सुट्ट्या रद्द

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!