पुणे : येत्या मे महिन्यात देशाची जनगणना होणार आहे. त्यामुळे जनगणनेचा सर्वे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणूका करण्यात येणार असल्याने त्यांच्या मे महिन्याच्या सुट्ट्या रद्द होणार आहे. भारतात देशाची जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते. त्यामुळे पिंपरी चिंचवड येथील जनगणना अधिकाऱ्यांनी शिक्षक अधिकाऱ्यांना शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्याबाबत पत्र दिले आहे. परंतु शिक्षकांच्या मे महिन्याच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा येणार असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हा निर्णय पाठी घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे.
२०२१मध्ये जनगणना करण्यात येणार आहे. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणं, गटाची विभागणी, घर यादी तयार करणं आदी कामे करण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यासाठी त्यांच्या रजा रद्द केल्या जाणार आहेत.
मे महिन्यातील सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळं वर्षातील ७६ पैकी तब्बल ३९ सुट्ट्यांना शिक्षकांना मुकावं लागणार आहे. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात येण्याच्या जनगणना अधिकाऱ्यांच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने विरोध दर्शविला आहे.
जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या या हक्काच्या सुट्ट्या रद्द केल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जनगणना अधिकाऱ्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या शिक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक परिषदेने हा निर्णयाचा निषेध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे.

