धुळे : पडळकर प्रकरणावरून दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मला व फडणवीस यांना काहीही बोलेले चालत का ?’ असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला होता. याला पुर्वाश्रमीचे भाजप नेते आणि आता राष्ट्रवादीत असणारे अनिल गोटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांना ‘चंपा’ म्हणतात यांचे तीव्र दु:ख होत असल्याचे गोटे यांनी म्हटलंय. मात्र चंद्रकांत दादांना हे माहित नसावे की, त्यांचे ‘चंपा’ नावाचे बारसे स्वत: गिरीष महाजनांनी केले. महाजनांच्या कार्यालयात बसलो असतांना अरे त्या ‘चंपा’ ला फोन लाव असे सांगितले, असं गोटेंनी म्हटलं आहे. भाजपमध्ये स्वत:चं नाव आणि आडनाव एकत्र करुन उल्लेख करण्याची पध्दत आहेच. नरेंद्र मोदींना ‘नमो’ म्हणतात अमित शाहांना ‘मोटाभाई’ म्हणतात तसेच चंद्रकांत पाटलांना ‘चंपा’ म्हणत असावेत. असे आपले भोळे भाबडे विचार असल्याचं म्हणत अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळीने भागवली भूक, आतापर्यंत २८ लाख ८५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा आहे, त्यामुळे आपण त्यांच्याबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाही. "नो कॉमेंटस’. अशा गिरीश महाजन यांनी गोटे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.
अनिल गोटे यांना काहीही बोलण्याची मुभा आहे, ते कोणतेही वक्तव्य करू शकतात. ते काहीही बोलू शकतात. त्यांना बोलण्याचे सर्व स्वातंत्र्य आहे. धुळेकरांना हे चांगले माहीत आहे. त्यांचे वक्तव्य फारसे कोणीही गांभीर्याने घेतही नाही, त्यामुळे त्यांनी काहीही बोलले तरी आपण कोणतेही वक्तव्य करणार नाही. गोटे यांच्या वक्तव्याबाबत आपले "नो कॉमेंटस’ आहे. अस महाजन म्हणाले आहेत.
‘विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोनामुक्तीची’, पांडुरंगाला गृहमंत्र्यांचे साकडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

