Share

वर्ल्ड कप २०१९ : ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये, इंग्लंडच्या अडचणीत वाढ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लडला धूळ ६४ धावांनी धूळ चारत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे . या पराभवामुळे इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर पाकिस्तान आणि बांग्लादेशाच्या सेमी फायनल खेळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियानं दिलेल्या २८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २२१ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकडून बेन स्टोक्स वगळता एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर टिकता आलं नाही. त्याने ८९ धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरनडॉर्फने ५ गडी बाद केले तर स्टार्कने ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. स्टार्कने जो रूट आणि इयॉन मॉर्गनला बाद करून आघाडीची फळी तंबूत धाडली. त्यामुळे इंग्लंडच्या मधली फळीही काही खास कामगिरी करू शकली नाही.

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. ऑस्ट्रेलियाने फिंचच्या शतकाच्या आणि वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकांत २८५ धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर आर्चर, वूड, स्टोक्स, मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

ऑस्ट्रेलिया १२ अंकांसह अंकतालिकेत अग्रस्थानी आहेत. तर इंग्लंड ८ अंकांसह चौथ्या स्थानावर आहे तर टीम इंडिया ९ अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!