बीड : माजलगाव शहरातील विविध भागांमध्ये 111 विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे. याअनुषंगाने राज्यशासनाकडून तब्बल 22 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी शहरातील 38 रस्त्यांच्या कामांना आज सुरुवात झाली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ झाला. माजलगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १ ते १२ या प्रभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३८ रस्त्यांच्या विकास कामांचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
माजलगाव शहरात सध्या 38 रस्त्यांची कामे प्रस्तावित असून रविवारी (दि.७) त्यांच्या कामांचा शुभारंभ झाला. सकाळी 9 वाजता एचडीएफसी बँक ते छत्रपती शिवाजी विद्यालयापर्यंत रस्त्याच्या कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, सभापती कल्याण आबुज, सभापती संभाजी शेजूळ, बाबूराव पोटभरे, अच्युत लाटे, दयानंद स्वामी, जयदत्त नरवडे, खुर्शीद नाईक, चंद्रकांत शेजूळ, नासेर पठाण यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.
पालिकेकडे शासनाचा कोट्यविधींचा निधी असूनही केवळ अंतर्गत राजकारणामुळे अनेक विकास कामे रखडलेली होती. माजलगाव पालिकेवर आमदार सोळंके यांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले. नगराध्यक्षपदी शेख मंजूर यांची निवड केली. शासनाकडून आलेल्या एकूण निधीपैकी 22 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून शहरातील रस्ते, नाल्यांसह एकूण 111 कामांचे नियोजन पालिकेने केले.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

