उस्मानाबाद : सरपंच हा लोकशाहीचा मुख्य कणा आहे, सरपंचाने पूर्ण झोकून देऊन गावकऱ्यांना मूलभूत सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. सर्व व्यवस्था व अस्थापनात वेळोवेळीचे बदल स्वीकारून गावाचा विकास केला पाहिजे. सरपंच शिवाय गावचा व देशाचा विकास होऊ शकत नाही असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. तुळजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
तालुक्यातील नवनियुक्त सरपंचांच्या बैठकीचे आयोजन या वेळी करण्यात आले होते. पेरे पाटील म्हणाले की, ‘आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर ४०० वर्षांपूर्वी शोषखड्डा संडास बांधला होता. ते आम्हाला कळायला इतकी वर्षे का लागली. देशपातळीवर पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान चालवले आहे, आतातरी आपण गावा-गावात स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढवली पाहिजे. मागच्या सरपंच यांनी काय काय केले विसरून जावं, आपल्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्यासाठी तरी शौचालयाचा दैनंदिन वापर केला पाहिजे. निवडणूकीत ज्या पध्दतीने डोकं लावतो त्याच प्रमाणे गाव विकासात लावा, तरच विकास शक्य आहे.’
अंगणवाडी, शाळा, व्यायाम शाळा सक्षम करा, वित्त आयोगातुन फक्त रस्ते किंवा इमारती बांधण्यापेक्षा आरोग्य व मूलभूत सुविधा यावर खर्च करावा. कोरोना आपत्तीत खूप काही शिकायला मिळाले, पण यातून काहीतरी शिकता आलं पाहिजे. सर्व गावच्या सरपंच यांनी योग्य नियोजन करून ग्रामपंचायत सेवा कराची वसुली करावी अन गावकऱ्यांना सेवासुविधा ही उपलब्ध करून द्याव्यात, असेही मत यावेळी भास्कर पेरे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. पाटोदा गावच्या सर्वांगीण विकासासाठी काय-काय केले याचेही दाखले यावेळी पेरे पाटील यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत…’
- कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार ५० हजार रुपये, केंद्राची माहिती
- शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- धक्कादायक: आयपीएल मध्ये कोरोनाची एन्ट्री; ‘या’ खेळाडूला झाली लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

