Share

शिवसेनेसोबत जाणार का ? पवार म्हणतात …

Published On: 

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगली कामगिरी करत चांगला विजय मिळवला. या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला चांगलंच फटकारून काढलं.

शरद पवार म्हणाले की, महायुतीचं २२० पार जे सुरु होतं ते लोकांनी स्वीकारलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी पेक्षा जास्त जागा जिंकल्या, विरोधी पक्षांनी एकजुटीने काम केलं. सत्तेचा उन्माद लोकांना आवडलं नाही, प्रचारात किती टोकाची मते मांडावी याबद्दलची सीमा पार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं पवारांनी सांगितले.

सत्ता येते, सत्ता जाते. मात्र, आपण कायम जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर लोकांकडून स्वागत होतेच असे नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच यंदाच्या निवडणुकीत जनतेने काही अपवाद सोडले तर पक्षांतर केलेल्यांना पाठिंबा दिलेला नाही, याकडेही पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शिवसेनेच्या सोबत जाऊन भाजपला विरोधक सत्ता स्थापन करण्यापासून रोखतील असे अंदाज लावण्यात येत आहेत मात्र हि शक्यता पवारांनी फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून पुढेच निर्णय घेतील. परंतु, आम्ही निश्चितपणे शिवसेनेबरोबर जाणार नाही असं पवारांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1187295976744091648?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187294443621085184?s=20

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!