Share

विरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र जे सोबत येणार नाहीत, विरोधात जातील त्यांना आडवे करण्याची ताकत पक्षात आहे असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिला.कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा आढावा झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

भाजप-शिवसेना युतीसंदर्भात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, युतीचा निर्णय दिल्लीत नव्हे तर मुंबईत होईल.शिवसेनेबरोबर भाजपची परंपरागत युती आहे.जनतेला युती हवी आहे, भाजपलाही ती हवी आहे मात्र शिवसेना युती करण्यास तयार नाहीये.युती न झाल्यास लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढल्या जातील. संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची तयारी पक्षाने केली आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!