Share

अंमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षाचंं दिली पाहिजे ! – अजित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्य विधी मंडळाचे अधिवेशन सुरु आहे. यात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरु आहे. अशातच अमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टमार्फत विक्री होत आहे या विषयावर चर्चा करताना अमली पदार्थ विकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

याविषयी बोलताना पवार यांनी अंमली पदार्थामुळे तरूण पिढी बर्बाद होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे आपला ११ वी, १२ वीला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही. आता मुंबई, ठाणे, नागपूर हे शहर वगळता इतर महाराष्ट्रात देखील अंंमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर जर रोख लावायचा असेल तर अंंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, पवार यांनी पुढे बोलताना ‘आता अंंमली पदार्थ रस्त्यावरील अनधिकृत पानटपऱ्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विकले जात आहेत. तसेच जनरल स्टोअर्सचे परवाने रद्द करून काहीही होणार नाही, ही खिशातली दुकाने बंद करा, असेही अजित पवार म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!