Share

भाजपची साथ सोडल्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नाही – राजू शेट्टी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : हातकंगले मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडल्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नाही नसल्याच स्पष्ट केलं आहे. आजघडीला सगळ्यात जास्त बुडवेखोर साखर कारखानदार भाजपमध्ये असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सगळ्या छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले आहे.

त्यासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली असून लवकरच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना देखील भेटणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत लोकांनी मते मलाच दिली होती मात्र, ती माझ्यापर्यंत आली नाहीत, असे म्हणत आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असून दिलेली मते दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!