Share

रब्बीच्या तिसऱ्या आवर्तनासाठी परभणीत डाव्या कालव्यातून पाणी दाखल

Published On: 

परभणी : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी पाथरीत दाखल झाले आहे. यंदा पावसाळ्यामध्ये खुप चांगला पाऊस पडल्याने जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. जायकवाडीमधून परभणी, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यामध्ये धरणाच्या पाण्याचे लाभ क्षेत्र आहे.

आता १ मार्चपासून चार पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनातील तिसरे आवर्तनाचे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह इतर प्रमुख पिकांना लाभदायक असणार आहे.

यापुर्वी २७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२० ला पहिले आवर्तन, ८ ते ३० जानेवारीपर्यंत दुसरे आवर्तन होते. तिसरे पाणी मात्र कमी क्षमतेने दाखल झाले आहे. वितरीकेच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!