टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराचे आज नशीब उलगडणार आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरवात होणार आहे. 288 मतदारसंघात एकाच टप्यात मतदान झाले होते. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मतदाना नंतर आलेल्या एक्झिट पोल नुसार भाजप शिवसेना महायुतीला बहुमत मिळणार आहे. 200 जागांहून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुन्हा अल्पमतात असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 70 जागा मिळवणेही महाआघाडीला कठीण जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.
या निवडणुकीला उमेदवारांची संख्या 3237 एवढी होती. तर त्यामध्ये 235 महिला उमेदवारही आहेत. तसेच 1 जागा तृतीयपंतींना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे मतदार राजाने नेमकं कोणाला मत दिलं आहे हे काही वेळातच समोर येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1186966713243275265?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186966563703808005?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186961938078564352?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

