टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच कॉंग्रेसची ही अवस्था झाली आहे. पण आता चिंतन करण्याचा सुध्दा काँग्रेस पक्षाचा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. संगमनेरात एका खासगी कार्यक्रमानिमित्त विखे-पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी खांडगाव येथील ग्रामस्थांशी विखे पाटलांनी संवाद साधला. यावेळी विखे पाटलांचे निळवंडे धरण कालव्यांच्या कामाबाबत झालेल्या निर्णयाबद्दल ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. तर केवळ निर्णयच नाही, तर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली असल्याचे विखे यांनी ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे निळवंडे कालव्याच्या प्रश्नासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पक्षविरहीत संघर्ष केला. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीत झालेले निर्णय महत्वपूर्ण आहेत. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केलेले सहकार्य आणि जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनीही घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

