🕒 1 min read
मुंबई: मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत भारताने श्रीलंकेला पराभूत केले आहे. तसेच दोन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी देखील घेतली आहे. १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या चाहत्यांना आनंदीत केले आहे. रविवारी कसोटी संपल्यानंतर कोहलीने हॉटेलसाठी टीम बसमध्ये चढण्यापूर्वी एका चाहत्याला त्याची जर्सी भेट दिली आहे.
विराट कोहलीसाठी (Virat kohli) मोहालीचा सामना विशेष होता. विराट १०० वा कसोटी सामना खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू ठरला. ज्या यादीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यासह इतर मोठया नावांचा समावेश आहे. विराटने बसमध्ये चढण्याआधी त्याच्या एका चाहत्याला पहिले आणि त्याला कसोटीची जर्सी भेट दिली. त्या चाहत्याने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत लिहले “माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण. कोहलीने मला त्याची जर्सी दिली”
Wow it's great day my life @imVkohli he's 100th test match he's gifts me t shirts wow ???? #viratkholi #ViratKohli100thTest #KingKohli pic.twitter.com/mxALApy89H
— dharamofficialcricket (@dharmveerpal) March 6, 2022
विराट कोहलीने त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यात ४५ धावांची खेळी केली. श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यामुळे भारताला दुसऱ्यांदा फलदांजी करावी लागली नाही. मात्र विराटने क्षेत्ररक्षण करतानाही चाहत्यांचे मनोरंजन केले. सामना संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचे समर्थन आणि प्रेमासाठी आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीत शिवसेनेचे आमदार नाराज? संजय राऊत म्हणाले…
- रवींद्र जडेजाला कसोटीत पाच नंबरला खेळवू नका, माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
- लोकांच्या मनातील राग मतपेटीतून बाहेर येईल – संजय राऊत
- महिला दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांना मिळालं मोठं गिफ्ट..!
- पीच क्युरेटरमुळे भारताने WTCचा सामना गमावला? समोर आली मोठी माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
