मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्यासोबतच आज देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ‘मला भावलेले पवार साहेब’ असे कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच ते म्हणाले की,’आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दूरदर्शी दृष्टिकोन, लोकांची सेवा करण्याची वचनबद्धता आणि प्रचंड इच्छाशक्ती, संयमी स्वभाव खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आई जगदंबा त्यांना चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना.’
मला भावलेले पवार साहेब….#sharadpawar #amolteanamolhttps://t.co/APsiQDQrpi
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 11, 2021
आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दूरदर्शी दृष्टिकोन, लोकांची सेवा करण्याची वचनबद्धता आणि प्रचंड इच्छाशक्ती, संयमी स्वभाव खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आई जगदंबा त्यांना चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना!#SharadPawar pic.twitter.com/h8D6uGjO0J
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 12, 2021
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,’आदरणीय खासदार शरद पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहकार्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मेगा जॉब फेयर २०२१ आयोजित करण्यात आले आहे. या मेगा जॉब फेयरचे उद्घाटन आज माझ्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. या मेगा जॉब फेयर २०२१ ची नोंदणी १७ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी https://aaplesaheb.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.’
महत्वाच्या बातम्या
- …तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली- संजय राऊत
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- ‘सरकारने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं वाटोळ करण्याचा संकल्प केला’

