Share

Rohit Pawar | “वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावे” ; शिंदे गटापूर्वी रोहित पवारांची कामाख्या देवीला प्रार्थना 

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज गुवाहाटीसाठी रवाना झाले आहेत. गुवाहाटी महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजाविधी करणार आहेत. विरोधी नेते शिंदे गटाच्या दौऱ्यावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटापूर्वी महाराष्ट्रासाठी आणि शिंदे गटातील आमदारांसाठी कामाख्या देवीला प्रार्थना केली आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “हे माता कामाख्या देवी.. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना!. सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये. युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये. महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये. वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावे, अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी. राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा. अंधश्रद्धा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये. तसेच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी. हे अडचणींचे ‘डोंगार’ पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान 200 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी रविवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह जून 2022 मध्ये सुरतमार्गे गुवाहाटी येथे शिवसेनेविरुद्ध बंड करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेले होते. आता राज्यात त्यांचे सरकार असून ते मुख्यमंत्री झाले असल्याने ते पुन्हा गुवाहाटीला जाऊन देवीचे दर्शन घेत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत.

100 खोल्या बुक-

शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीतील एका आलिशान हॉटेलमध्ये आठवडाभराहून अधिक काळ थांबले होते. यावेळीही शिंदे आणि त्यांच्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये 100 खोल्या बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा –

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. याच महिन्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही बंडखोर आमदार आणि खासदारांवर चांगलीच तोफ डागली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे बुलढाण्यात येत असून, ते कोणावर आपले टीकास्त्र सोडतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

चिखली येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकरी मेळावा घेणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व होते. एक खासदार आणि दोन आमदार शिवसेनेचे होते. मात्र खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav), आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेला महत्व प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!