औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल १० महिन्यांनंतर ३ फेब्रुवारीपासून इंडिगोची अहमदाबाद-औरंगाबाद-अहमदाबाद विमानसेवा सुरू होत आहे. या विमानसेवेमुळे औरंगाबादहून अहमदाबादेत अवघ्या दीड तासात पोहोचता येणार आहे. औरंगाबाद-अहमदाबादसाठी विमानसेवा नियमित सुरू झाली होती. या सेवेमुळे गुजरातसह औरंगाबादच्या उद्योजकांना फायदा झाला होता. मात्र, लॉकडाउनमुळे इंडिगोने ही सेवा काही काळ ठप्प ठेवली होती.
कोरोनाचा विळखा सैल झाल्यानंतर औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली. काही दिवसांपासून अहमदाबादसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर ३ फेब्रुवारीपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. अहमदाबादला वाहनाने जाण्यासाठी बराच वेळ जातो; परंतु अहमदाबादला थेट विमान सुरू होणार असल्याने हा प्रवास दीड तासावर येणार आहे. विमान प्रवाशांबरोबर व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
उद्योजक सुनीत कोठारी यांनी माध्यमांना सांगितले की, इंडिगोचे औरंगाबाद-अहमदाबाद विमान दररोज राहील. ७८ आसनी एटीआर विमानाद्वारे ही सेवा दिली जाईल. यापुढे औरंगाबादला नागपूर, पुणे आणि इंदूरची हवाई कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
वेळापत्रक
इंडिगोचे विमान अहमदाबाद येथून दररोज सकाळी १०.४५ वाजता उड्डाण घेईल आणि दुपारी १२.१५ वाजता औरंगाबादेत पोहोचेल. त्यानंतर दुपारी १२.४० वाजता हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता अहमदाबादला दाखल होईल.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय
- ममतादीदींच्या अडचणी वाढल्या,जेष्ठ मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- टीम इंडियानं सर्वांना ‘आत्मनिर्भर’तेचा धडा शिकवला : मोदी
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले


