टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
विशेष म्हणजे माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या भेटी दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे.
दरम्यान, आज मातोश्रीवर सचिन अहिर आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप – सेना युतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप – सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

