टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. हे पक्षांतर खासकरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील पक्षांतराच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर आज वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून उद्या सकाळ पर्यंत भाजप प्रवेशाचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यांनतर पिचड यांच्या पक्षांतराच्या चर्चेला सुरवात झाली. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. वैभव पिचड हे माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र असून अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र आता पिचड यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितल जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षाकडून गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीला वैभव पिचड हे गैरहजर होते. त्यामुळे वैभव पिचड यांचा पक्षांतराचा निर्णय झाला असल्याचं पक्षातील नेत्यांनी समजून घेतल आहे. त्या दृष्टीने पिचड यांनी कार्यकर्त्यांची बैठक देखील बोलावली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

