Share

Sushma Andhare | ” शरद पवार शरद पवार मेथीच्या लाडूसारखे तर राज ठाकरे…”, सुषमा अंधारेंनी नेत्यांना दिल्या फराळांच्या उपमा

Published On: 

Sushma Andhare | मुंबई :  देशभरात दिवाळी जोरात सुरु आहे. तब्बल दोन वर्षांनी फटाक्यांचा जोरदार आवाज ऐकायला मिळत असून अनेक ठिकाणी दिवाळी पाहाट सारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील नेते देखील काहीसे शांत दिसत आहे. सर्वांच्या घरात फराळाची तयारी सुरु असून फराळ देखील बनले आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नेत्यांना फराळांची उपमा देत टीका केली आहे.

सुषमा अंधारे सध्या बीडच्या परळीमध्ये आपल्या माहेरी आल्या असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ तयार केला. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असं म्हणत शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात, असं अंधारे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. यावेळी अंधारे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दलही सांगितले, राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

दरम्यान, फटाक्याची लड म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी राणे कुटंबाला डिवचलं आहे, नवनीत राणा यांचा सुषमा यांनी उल्लेख गोल गोल आणि काटेरी दिसणाऱ्या चकली, असा केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!