Share

Video- रहस्यमय ‘राक्षस’ चा टीजर लाँच

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती आता या टीजर मुळे आणखी वाढली आहे.

sharad-kelkar-plays-a-leading-role-in-rakshash

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. या टीजर मधून ‘राक्षस’ ही आदिवासी, जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. “जंगल गाणं गातं, ते हसतं – रडतं त्याला भावना असतात” असे यात म्हटले आहे तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय ‘आई, बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय’. या संवादामुळे गूढ वाढलेल्या ‘राक्षस’ मध्ये नक्की काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

दरम्यान, ‘राक्षस’ चित्रपटात शरद केळकर, साई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत.

घनदाट, किर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहे? आणि या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.

‘राक्षस’ चा टीजर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

https://youtu.be/K1mt8_om4eU

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!