Share

महाराष्ट्रात ५० लाख सदस्य बनविण्याचे भाजपचे लक्ष

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आता भाजप पक्षविस्ताराच्या कामासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. देशभरात ‘सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप’ हा संकल्प भाजप राबविणार आहे. या संकल्पाप्रमाणे भाजपचे ५० लाख नवीन सदस्य करण्याचा मानस भाजपने केला आहे, अशी माहिती सदस्यता नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख शिवराजसिंह चौहान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत नवीन सदस्य नोंदणीसाठी ही मोहीम राबविली जाणार आहे. महाराष्ट्रातील ९५ हजार ४०० बूथवर प्रत्येकी ५० अशा रितीने भाजपचे ५० लाख नवीन सदस्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ६ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सदस्यता नोंदणीला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ९५ हजार ४०० बूथ आहेत. प्रत्येक बूथवर ५० नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठरवण्यात आले असून त्यामुळे राज्यात भाजपचे ५० लाख नवीन सदस्य होतील. चार ते पाच बूथ मिळून एक अशा रीतीने राज्यात २० हजार शक्तीकेंद्रे आहेत. या शक्तीकेंद्रातील विस्तारकांना ६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत केवळ नवीन सदस्य नोंदणीचे काम करण्यास सांगण्यात येणार आहे, असे चौहान यांनी सांगितले.

भाजपच्या सर्वोच्च कामगिरीसाठी पुन्हा संघटना बांधणीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हाती घेतले आहे. बंगाल, ओडिसा, तेलंगणा, केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपचे सरकार येईल आणि काश्मीर खोऱ्यातही पक्षाला यश मिळेल, तेव्हा ती पक्षाची सर्वोच्च कामगिरी असेल, असे प्रतिपादन चौहान यांनी केले.

देशभरात भाजपचे ११ कोटी तर महाराष्ट्रात एक कोटी सदस्य सध्या आहेत. या सदस्य नोंदणीत त्या भागातील सर्व समाजातील, सर्व वर्गातील लोकांना भाजपशी जोडले जाणार आहे, असेही चौहान या वेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!