Share

…अन्यथा सर्वांचे आरक्षण रद्द करा – खासदार उदयनराजे भोसले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षणावर भाष्य केले आहे. धनगर, लिंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा, अन्यथा सर्वांचे आरक्षण रद्द करा, असे वक्तव्य उदयनराजे यांनी केले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना आरक्षण लागू करा अशी मागणी केली आहे. आरक्षणामुळे जाती-धर्मात भांडणे लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना आरक्षण लागू करा. अन्यथा सर्वांचे आरक्षण रद्द करा असे उदयनराजे यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे. सगळे आरक्षण रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देऊ नका असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हीएम तोडा आणि माणसे जोडा. असेही त्यांनी म्हंटले. त्यावेळी, तुम्ही ईव्हीएमवर झालेल्या मतदानातून निवडून आलात, तरीही त्यावर संशय घेताय, असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला असता, माझं ठाम मत आहे की निवडून येणं महत्त्वाचं नाही. मी यापूर्वीचा पराभव पचवला आहे. पण यावेळी माझ्या मताधिक्यात दोन-सव्वा दोन लाखांनी घट झाली. सोलापुरातही ज्यांच्या जाहीर सभांना गर्दी झाली ते पराभूत झाले. ज्यांना कोण ओळखत नाही, असे लोक निवडून आले. असे त्यांनी म्हंटले.

तसेच, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व जागांवर दोन-अडीच लाखांचा फरक आहे, त्यामुळे लोकसभेची फेरनिवडणूक व्हावी अशी माझी मागणी आहे, असेही त्यांनी म्हंटले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!