बीड : लोकसभा निवडणुकी दरम्यान कृष्णा भगवान डोंगरे ही व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील प्रचारसभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर मोदी सरकारच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्धार या महाशयांनी केला आहे. तो मुळचा नगरसूल, ता. येवला येथील असून राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
मोदी सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अंगात शर्ट-बनियन न घालण्याचे डोंगरे याने ठरविले आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी सावध पवित्रा घेत विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
केंद्रातील भाजप सरकारने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही, असा आरोप करत कृष्णा डोंगरेने मार्च महिन्यात नगरसूल येथील पोस्टातून दिल्ली येथील पीएमओ कार्यालयास आपले अंगवस्त्र एका स्पीड पोस्टद्वारे रवाना केले होते. ही कृती करताना कृष्णा डोंगरे यांनी केंद्र व राज्यातील विद्यमान राज्यकर्ते हटत नाहीत तोपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहण्याचा निश्चय केला होता. त्यानंतर डोंगर अर्धनग्न अवस्थेतच गावभर फिरत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

