अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- के.के.रेंज विस्ताराचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये चांगलाच ऐरणीवर आला आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यातील २३ गावातील जमीन अधिग्रहण होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. के.के.रेंज विस्तारीकरणाबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. परंतु के.के.रेंजचा प्रश्न सोडवणे शरद पवार यांच्यामुळेच शक्य झाले आहे.
पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के ही लढाई जिंकलो आहोत, असा दावा पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी केला आहे. माझे नाते शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करायचे नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे, ते नगरमध्ये बोलत होते.
आ.निलेश लंके पुढे म्हणाले की, के.के.रेंजसाठी शेतकऱ्यांची एक इंच सुद्धा जमीन जाणार नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई शंभर टक्के जिंकलो असून हा प्रश्न सोडवणे शरद पवार यांच्यामुळेच शक्य झाले. कारण हा प्रश्न बऱ्याच वर्षापासून म्हणजे १९६९ पासून प्रलंबित होता. तो शरद पवार यांच्या माध्यमातून सोडवण्यात यश आले आहे.
तसेच शरद पवार आणि संरक्षणमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत पवार यांनी संरक्षणमंत्र्यांना सांगितले की, मुळा धरणामुळे एकदा हे ग्रामस्थ विस्थापित झाले आहेत. आता के.के.रेंजच्या विस्तारीकरणासाठी भूमिअधिग्रहण केल्यास त्यांना पुन्हा विस्थापित व्हावे लागेल, हे निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर आता कर्नल कानन यांनी काही दिवसांपूर्वी के.के.रेंज क्षेत्रात नव्याने भूमिअधिग्रहण केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे २३ गावांमधील जनतेचा संभ्रम दूर झाला आहे. पवार यांची शिष्टाई सफल झाली, असे आ.लंके म्हणाले.
तसेच मला भाजपच्या नेत्यांविषयी बोलायचे नाही. माझे नाते शेतकऱ्यांसोबत आहे. मला शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करायचे नाही. मला शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्याचा असून कोणावरही टिपा-टिप्पणी करायचे नाही, असे आ.लंके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? संजय राऊत यांचा हल्लाबोल
- मराठा समाजाच्या उद्रेकाची सरकार वाट पाहतेय कि काय?
- वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे खेळू शकलो याचा मला अभिमान!
- मराठा आरक्षणासंदर्भात ‘ठाकरे सरकार’ला अजिबात गांभीर्य नाही : गिरीश महाजन
- दीपिका पादुकोणच्या मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबीने बजावले समन्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

