मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) २ ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केला. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरु आहे. यातून अनेकांचे नावे समोर येत असून एनसीबी त्या दिशेने तपास करत आहे. आज याप्रकरणी पुन्हा दोघंना एनसीबीने अटक केली आहे.
हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती.
यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींसह बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा समावेश आहे. मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही ताब्यात घेतले आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत. असे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

