टीम महाराष्ट्र देशा : मालिका आणि सिनेमांची नाव आता भारतीय भाषांमध्येही देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातला आदेश जारी केला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातली माहिती देताना सांगितलं की मंत्रालयाकडून टीव्ही वाहिन्यांना आदेश दिला जाणार आहे की मालिकांची नावे , क्रेडिट्स आता भारतीय भाषांमध्ये दिली जावीत.
https://twitter.com/PIB_India/status/1139483858921914368
या निर्णयामुळे टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला आणि शेवटी येणाऱ्या श्रेय नामावलीत इंग्लिशसोबत स्थानिक भाषेचाही वापर करावा लागणार आहे. हाच आदेश आम्ही चित्रपटांसाठीही लागू करत आहोत असंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.

