मुंबई : नुकतीच नागपूर महापालिकेच्या आयुक्ता पदावरून मुंबईमध्ये बदली झालेल्या तुकाराम मुंडेंनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटले कि, "आज माझा कोवीड १९ चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. करोना पॉझिटिव्ह असल्यावर त्याचा सामना पॉझिटिव्ह विचार आणि कृतीने केला पाहिजे. दृढ इच्छाशक्ती, निश्चय आणि एकत्रितपणे काम केल्यास या संकटावर विजय मिळतवा येईल.
विधानपरिषद उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार, कोण मारणार बाजी?
https://twitter.com/Tukaram_IndIAS/status/1302598400366358529?s=20
काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांची बदली नागपूरहून मुंबईमध्ये करण्यात आली आहे. आपल्या चोख आणि धडाकेबाज कार्यकशैलीमुळे मुंडे नेहमी चर्चेत राहतात. त्यांच्या अनेक निर्णयांमुळे त्यांना राजकीय संघर्षालाही सामोरे जावे लागते. गेल्या १५ वर्षात त्यांची १४ वेळा बदल्या झाल्या आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

