Share

रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर दुतर्फा वृक्ष लागवड – जयकुमार रावल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागामार्फत हाती घेतली जाणार आहेत. रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

शासनाच्या रोहयो विभागामार्फत जिल्हाधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांनाही याबाबत आदेश पाठविण्यात आले आहेत. या माध्यमातून स्थानिक रोहयो मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांचे सुशोभिकरण होण्यास मदत होईल, असे मंत्री रावल यांनी सांगितले.

रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. राज्यातील किल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन करण्याचे कामही आता रोहयो योजनेतून करता येत आहे. त्या माध्यमातून किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. किल्ले परिसरात वृक्ष लागवड करणे, रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, जलसाठ्यांचे संवर्धन करणे अशा विविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात येत आहेत.

रायगड किल्ले परिसरात नवीन होणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची कामे हाती घेण्यात यावीत, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. रायगड विकास प्राधिकरणाच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण व संगोपनाच्या कामाचे नियोजन करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!