🕒 1 min read
Randeep Hooda | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) ‘कॅट’ (CAT) या वेब सिरीज (Web Series) च्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. या वेब सिरीजमध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या ड्रग्स तस्करी बद्दल दाखवण्यात आले आहे. ही वेब सिरीज प्रसिद्ध ओटीपी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज होणार आहे. ‘कॅट’ या वेब सिरीजमध्ये रणदीप पंजाबमध्ये ड्रग्स तस्करीमध्ये अडकलेल्या आपल्या भावाची सुटका करताना दिसणार आहे.
गुन्हेगारी, हेरीगिरी, बंधुत्व आणि मानवी संघर्ष यावर ‘कॅट’ वेब सिरीज आधारित आहे. यामध्ये कौटुंबिक बंधन, राग, सुड यासारख्या भावना ठळकपणे दाखवण्यात आलेला आहे. ‘कॅट’मध्ये रणदीप गुरुनाम सिंग या पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ओटीपी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ‘कॅट’चा ट्रेलर रिलीज केला होता. 1.40 सेकंदाचा या सिरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आले होते की, ‘कॅट’ ही स्टोरी पंजाबमध्ये होणाऱ्या ड्रग्स तस्करीवर आधारित आहे. या सिरीजमध्ये रणदीपचा भाऊ ड्रग्सच्या तस्करीमध्ये अडकतो आणि पोलिसांच्या ताब्यात जातो. अशा परिस्थितीत रणदीप त्याच्या भावाला ड्रग तस्करीतून वाचवण्याचा प्रयत्न करताना दाखवला आहे.
Randeep Hooda | आज रणदीप हुड्डाच्या 'कॅट'चे रहस्य उलगडणार, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शितhttps://t.co/vaVP4vUYws
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 9, 2022
काही दिवसांपूर्वी रणदीप हुड्डाच्या ‘कॅट’ या वेब सिरीजचा ट्रेलर समोर आला होता. त्यानंतर चाहत्यांची या वेब सिरीजबद्दल आणखीनच आतुरता लागली होती. चाहत्यांची ही दीर्घकाळ प्रतीक्षा आज संपलेली असून ‘कॅट’ ही वेब सिरीज नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
निर्माते-दिग्दर्शक बलविंदर सिंग जंजिरा यांनी या वेब सिरीज साठी खूप मेहनत घेतली आहे. ‘कॅट’मध्ये रणदीप हुड्डा व्यतिरिक्त सुविंदर विकी, हसलीन कौर, गीता अग्रवाल आणि जयप्रीत सिंग इत्यादी कलाकार देखील दिसणार आहे.
- PAK vs ENG | इंग्लंडचे वास्तव्य असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार, संघातील खेळाडूंना बसला जोरदार धक्का
- Cyclone Mandous | ‘मंदोस’ चक्रीवादळामुळे राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
- Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन प्रकिया सुरू
- वृत्तपत्रावरील खाद्यपदार्थ खाणं आरोग्यास हानिकारक: FSSAI
- Devendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपांवर फडणवीसांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
