Share

#Happy Birthday : बॉलीवूड ‘वीरू’ उर्फ धर्मेंद्र यांचा 85वा जन्मदिवस

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारे अभिनेते धर्मेंद्र यांचा आज 85वा जन्मदिवस. धर्मेंद्रने आपल्या चित्रपट कारकीर्दीत कित्येक उत्तम चित्रपटांसह अनेक संस्मरणीय व्यक्तिरेखा आणि भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या ‘अपने 2’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते आहे. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे अ‍ॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता.

नुकतेच धर्मेंद्र यांनी ट्विटरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी एक ट्विट केले होते. ‘सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढावा, देशात कोरोना प्रकरणे वाढत आहेत’, अशा आशयाचे हे ट्विट होते. मात्र, लोकांनी या ट्विटचा चुकीचा अर्थ लावून त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले.

या डिलीट केलेल्या ट्विटविषयी बोलताना धर्मेंद्र म्हणाले, ‘मला फक्त असे म्हणायचे होते की, एकदा शेतकऱ्यांचे ऐका. मी नेहमी सकारात्मक बोलतो पण, लोक त्याचा चुकीचा अर्थ लावतात. ट्विटरवर राग व्यक्त केला जात आहे. आता मी स्वत:ला त्यापासून दूर ठेवीन. कारण यातून लोकांची दुखावत आहेत.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या आगामी ‘अपने 2’ या चित्रपटात देओल कुटुंबाच्या 3 पिढ्या झळकणार आहेत. याविषयी सांगताना धर्मेंद्र म्हणाले, ‘मी माझ्या नातवाबरोबर काम करत आहे ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!