Share

कोरोनाची तीन नवे लक्षण जगासमोर, ‘ही’ लक्षणे तुम्हाला असतील तर टेस्ट करून घ्या !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासह नवी लक्षणेही समोर आली आहेत. आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणाऱ्या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना व्हायरसचे संभाव्य संकेत मान्य केले आहेत. नाक वाहणे, मळमळ होणे आणि अतिसार कोरोना व्हायरचे ही तीन नवीन लक्षणे आहेत.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दारात वाढ

सीडीसीच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचं नाक सातत्याने वाहत असेल आणि त्याला अस्वस्थ वाटत असेल, शिवाय ताप नसेल तरीही अशा व्यक्तीने कोरोनाची चाचणी करायला हवी. त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असावी.

मळमळ होणं हे कोरोनाचं आणखी एक लक्षण असल्याचं अमेरिकेच्या सीडीसी या संस्थेने म्हटलं आहे. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार मळमळ होत असेल किंवा उलटीसारखं वाटत असेल तर ही धोक्याची घंटा असू शकते. अशा व्यक्तीने तातडीने स्वत: विलग करायला हवं. मात्र मळमळ होण्याची इतर कारणंही असू शकतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करु नये. सातत्याने असं होत असल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी.

कोरोना तिसरं नवं लक्षण म्हणजे अतिसार. डॉक्टरांनी याआधीही मान्य केलं होतं की कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अतिसारासारखे मिळतेजुळते लक्षणे असतात. आता सीडीसीनेही मान्य केलं आहे की, जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे आढळले आहेत.

या तीन नवीन लक्षणांसह सीडीसीच्या यादीत कोरोना व्हायरसची एकूण 11 लक्षणे झाली आहेत. यापूर्वी शरीरात होणारे आठ बदल हे कोरोनाचे संभाव्य संकेत समजले जात होते. ताप आणि थंडी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी, चव न कळणे, घसादुखी आणि खवखव यांचा आठ लक्षणांमध्ये समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्ण इतरांनाही संक्रमित करु शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. वयोवृद्ध लोकांनी तसंच ज्यांना दमा, मधुमेह, हृदयविकार आहेत, त्यांच्यासाठीही कोरोना व्हायरस घातक ठरु शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्षणे ओळखणं अतिशय आवश्यक आहेत. लक्षणे ओळखूनच व्हायरस नियंत्रणात ठेवू शकतो.

दरम्यान, राज्यात रविवारी कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाच्या काळात पोलिसांनी शासनाची प्रतिमा उंचावली, गृहमंत्र्यांनी थोपटली पाठ

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख २३ हजार ५०२ नमुन्यांपैकी १ लाख ६४ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१७.८२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!