Share

‘या’ कॉंग्रेस नेत्याने धरली भाजप ऐवजी वंचित आघाडीची वाट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षांतराचा धडाका लावला आहे. तर आता कॉंग्रेसच्या एका नेत्याने भाजप – सेनेत प्रवेश न करता वंचित आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जयकुमार गोरे यांनी वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे वंचित आघाडीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आता जयकुमार गोरे यांनी आपला मोर्चा वंचित आघाडीकडे वळवला असल्याचं दिसत आहे. मध्यंतरी जयकुमार गोरे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे जयकुमार गोरे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं वावटळ उठल होत. मात्र आता यावर पडदा पडला असून गोरे आता वंचितमध्ये जाणार असल्याचं म्हंटल जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी करत मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे अनेक मतदारांनी पारंपारिक आघाडी आणि युतीला मतदान न करता वंचित आघाडीला प्राधान्य दिले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी वंचित आघाडी ही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आणि याचा फटका कॉंग्रेस आघाडीला सहन करावा लागला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडी स्वतंत्र लढत मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचं दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!