Share

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम होती’; मोहन भागवतांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले, आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. वीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती.

माजी पत्रकार आणि माहिती आयुक्त उदय माहूरकर यांच्या ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या पुस्तकाच्या उद्घाटनवेळी मोहन भागवत म्हणाले, “सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम होती. स्वातंत्र्यानंतर ही मोहीम खूप वेगाने पुढे गेली. आत्ता, संघ आणि सावरकरांना लक्ष्य केले जात आहे. यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद यांचा क्रमांक आहे, कारण वीर सावरकरांप्रमाणे त्यांच्याबद्दलही चुकीची माहिती पसरली आहे. वीर सावरकर जे कोणी होते, ते या तिघांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. मतभेद स्वाभाविक आहेत. हा आपल्या राष्ट्रीयत्वाचा मूलभूत घटक आहे. ज्यांना ते माहित नाही त्यांनी सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली आहे.” असे मोहन भागवत म्हणाले.

पुढे मोहन भागवत म्हणाले, जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असेही भागवत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!