टीम महाराष्ट्र देशा : बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यापासून सुरु होती, खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिला होता, मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चासुरु झाली होती. मात्र अखेर रविवारी सकाळी ११ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून कोणात्या नेत्यांची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारातील दोन नेत्यांची नाव निश्चित करण्यात आली आहेत. भाजपकडून अमरावतीचे आमदार अनिल बोंडे यांचे नाव विस्तारात निश्चित करण्यात आले आहे, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांना मंत्रिपद मिळणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेनेकडून या विस्तारात कोणाची वर्णी लागणार हे मात्र अद्याप ठरलेले नाही. तर उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेनेत पेटलेला वाद शांत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

