Share

‘सामना’च्या बाबतीत २० ऑगस्टला केलेले ट्विट खरे ठरले : नितेश राणे

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण तपासावरून सुरु झालेलं राजकारण आता सुमारे ३ महिने होऊन देखील अधिक तापलेलं पाहायला मिळत आहे. १४ जूनला सुशांतचा धक्कादायक मृत्यू झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, तर यामागे नेपोटीजमसह अनेक बड्या व्यक्तींचा हात असल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केली होती.

यानंतर, मुंबई पोलिसांनी अनेक दिग्गज दिग्दर्शक व बॉलिवूड स्टार्सची चौकशी करण्यात आली, तर मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांनी करत याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तपास अखेर सीबीआयकडे सोपावण्यात आला होता.

कई तुफानों का रुख मोड चुका हुँ! खासदार संजय राऊतांचा विरोधकांवर निशाणा

सीबीआय तपासामुळे महाविकास आघाडीला दणका बसल्याचे विरोधकांनी आरोप केले. दरम्यान, सीबीआय चौकशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या लेखातून हे प्रकरण मराठी, महाराष्ट्राची अस्मिता , मराठी माणूस या विषयांशी जोडून भावनिक केला जाईल असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट द्वारे केला होता.

https://www.facebook.com/471924039620091/posts/2355159581296518/?extid=7rzpDiYOAbJVpe7d&d=n

आता नितेश राणे यांनी यासंदर्भात आणखी एक ट्विट केले असून सद्याची परिस्थिती बघता २० ऑगस्टला केलेले ट्विट आज खरे ठरत असल्याचे म्हणत शिवसेनेसह खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. “Tweeting again!  So true २० ऑगस्टला केलेले ट्विट आज खरे ठरले. आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेख चे विषय : 1.)मराठी अस्मिता 2.)महाराष्ट्र धर्म 3.)मराठी माणूस. Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही.. तेव्हा Dino, Jacqueline, disha पाहिजे असतात.. वाट लागल्यावर लगेच मराठी माणूस !” असा निशाणा नितेश राणे यांनी साधला आहे.

२९ आमदार अन ८ मंत्र्यांना झालाय कोरोना, पावसाळी अधिवेशन कसे घेणार ठाकरे सरकार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!