🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 21 वा वर्धापन दिन आहे. आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा 21 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. आज यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांची फेसबुक पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसंच पक्ष कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! आपला विश्वास, आपली साथ आणि आपला पाठिंबा सदैव पक्षासोबत राहील, याची मला खात्री आहे. गेल्या २१ वर्षांच्या वाटचालीत पक्षानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत दिलेलं योगदान, राज्यात उभी केलेली युवा कार्यकर्त्यांची, नेतृत्वाची सक्षम फळी हीच पक्षाची ताकद आहे. हीच ताकद भविष्यातही महाराष्ट्राला प्रगतीकडे आणि पक्षाला उज्ज्वल यशाकडे घेऊन जाईल.
पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठींबा
शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या प्रत्येक संकटात आदरणीय शरद पवार साहेबांसह पक्षाचा कार्यकर्ता मदतीसाठी धावून गेला आहे. पक्षाची आजवरची यशस्वी वाटचाल ही आदरणीय साहेबांचं समर्थ नेतृत्व आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आज, पक्ष पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आहे. ही संधी गेली ५ वर्षे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षातून मिळाली आहे. तत्कालिन सरकारच्या शेतकरीविरोधी, लोकविरोधी धोरणांविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा, हल्लाबोल यात्रा, परिवर्तन यात्रा काढली. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर ‘जेलभरो’सारखी आंदोलनं केली. विधिमंडळात, विधिमंडळाबाहेर रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष केला. त्यातून पक्षाला ही संधी मिळाली आहे.
या संधीचा उपयोग राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, इच्छा,आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. दरम्यान, महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करीत असल्यानं पक्षाचा वर्धापन दिन अत्यंत साधेपणानं साजरा करायचा आहे. कुठेही जाहीर कार्यक्रम घ्यायचे नाहीत. गर्दी न करता, सोशल डिस्टन्सिंगचे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा, असं आवाहन पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
