Share

पुर्वी भावेच्या अंतर्नाद ह्या डान्स सीरिजमधले रिलीज झाले ‘भज गणपती’ गाणे

Published On: 

अभिनेत्री पुर्वी भावे नवीन डान्स सीरिज घेऊन आली आहे. ह्या अंतर्नाद सीरिजमधले पहिले ‘भज गणपती’ हे भरतानाट्यम नृत्यशैलीतले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या अल्बमचे वैशिष्ठ्य म्हणजे ‘भज गणपती’ गाण्याला पुर्वी भावेच्या आई सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावे म्हणते, “कोणत्याही शुभकार्याची सुरूवात आपण गणेश आरधनेने आणि वंदनेने करतो. त्यामुळे सीरिजची सुरूवात ‘भज गणपती’ ह्या गणेशवंदनेने झाली आहे. लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत आलीय. त्यामूळे सीरिज सुरू करताना पहिले गाणे भरतनाट्यम शैलीचे असावे असे मला वाटले. आणि त्यापध्दतीचे गाणे आईने कंपोज केले. आता ह्यापुढील गाण्यामधून तुम्हांला वेगवेगळ्या नृत्यशैली पाहायला मिळतील.”

‘भज गणपती’ गाणे सिन्नरमधल्या गुंदेश्वर मंदिरात चित्रीत झाले आहे. ह्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना पुर्वी म्हणते, “आम्ही ह्या गाण्याचे चित्रीकरण मे महिन्यात केले. तेव्हा ह्या मंदिराच्या परिसरातली जमीन एवढी तापायची की, अनवाणी चालणेही कठीण व्हायचे. तसेच ती जमीनही ओबडधोबड होती. त्यामुळे डान्स करणे कठीण जात होते. पण आम्हांला खूप कमी वेळाची परवानगी होती. त्यामुळे हे आव्हानही स्विकारावं लागलं. वेळेच्या अभावामूळे अनेक शॉट वेनटेक चित्रीत झालेत. पण आता ह्या आव्हानात्मक गाण्याच्या चित्रीकरणाचा रिझल्ट चांगला आहे. आणि आता युट्यूबवरून गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटतेय. ”

You tube

https://www.youtube.com/watch?v=qSQGlRC_PbY&feature=youtu.be

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!