Share

शिवभोजन थाळी वाटपाचा कोटा अपुरा, गरजूंना परतावे लागतंय रिकाम्या पोटी

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कठीण काळात हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळीच्या माध्यमातून एक महिनाभर रोज जवळपास 2 लाख थाळ्या भोजन मोफत दिलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पुणे शहरात ठिकठिकाणी गोरगरीब, गरजूंसाठी शासनाकडून शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या थाळीचा कोटा आणि वेळ अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे अनेक गरजू, गोरगरींबांना रिकाम्या पोटाने पुन्हा परतावे लागले.

शासनाने शिवभोजनाची दिलेली 11 ते 3 याळेत गरीब लोक मिळेल, त्या ठिकाणी काम करतात. त्या कामावरून सुटून लवकर यायचे म्हटले, तरी किमान साडे-बारा ते एक वाजतात. यावेळेत शिवभोजन थाळीचा कोटा संपलेला असतो. त्यामुळे शासनाने शिवभोजन थाळीचा कोटा आणि वेळही वाढवावी, अशी मागणी करण्यात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १३ एप्रिल रोजी शिवभोजन थाळी पुढील १ महिना मोफत देण्याची घोषणा केली होती. यानंतर, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू झाल्यानंतर १५ एप्रिल पासून शिवभोजन थाळी मोफत मिळणे अपेक्षित होते. मात्र, पुण्यात गरिबांना दोन दिवस या थाळीसाठी पैसे मोजावे लागले आहेत. यासाठी कारणीभूत ठरला तो सरकार आणि प्रशासनाचा गलथान कारभार ! वेळीच जीआर प्राप्त न झाल्याचे सांगत शिवभोजन केंद्रांनी पैसे आकारणी केली.

दरम्यान, दुपारनंतर आलेल्या या जीआरमध्ये १५ एप्रिल पासून पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, जीआर योग्य वेळी न आल्याने गरजुंना पैसे देऊनच थाळी घ्यावी लागली असल्याने या कारभाराला जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण झाला आहे. आता, हा जीआर आल्याने १६ एप्रिल पासून ही थाळी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!