मुंबई : राज्यात काल देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत दहा हजारहुन अधिक नव्या बाधितांची भर पडली आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच कोरोनामुक्तांचे वाढणारे प्रमाण देखील आता राज्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरत आहे. राज्यात, कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी आता ७१.०९ इतकी झाली आहे.
काल दिवसभरात, १३ हजार १६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांचा आणि नोंद झालेल्या ३४६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा तपशील खालील प्रमाणे (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) – मुंबई मनपा-११३२ (४६), ठाणे- २३७ (५), ठाणे मनपा-२४१ (९), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१२), उल्हासनगर मनपा-२० (३), भिवंडी निजामपूर मनपा-२६ (२), मीरा भाईंदर मनपा-१४० (३), पालघर-२३७(८), वसई-विरार मनपा-१८२ (६), रायगड-२७० (४), पनवेल मनपा-२२७ (३), नाशिक-२३१ (२), नाशिक मनपा-५२० (३), मालेगाव मनपा-२५ (१), अहमदनगर-२९६ (७),अहमदनगर मनपा-३०७ (६), धुळे-३० (२), धुळे मनपा-५८ (१), जळगाव-४९६ (८), जळगाव मनपा-१०९ (१), नंदूरबार-३८, पुणे- ६६० (२१), पुणे मनपा-१२३३ (३८), पिंपरी चिंचवड मनपा-७९५ (२७)
‘पक्षासाठी लढा देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी नेतृत्वपदाची गरज नाही’
सोलापूर-३९९ (१५), सोलापूर मनपा-६७ ,सातारा-२८६ (९), कोल्हापूर-३८७ (१३), कोल्हापूर मनपा-१४७ (२), सांगली-९६ (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-२२३ (१२), सिंधुदूर्ग-१४ (२), रत्नागिरी-४३ , औरंगाबाद-१७८ (१),औरंगाबाद मनपा-३६८, जालना-१५०, हिंगोली-३५(१), परभणी-४८, परभणी मनपा-५६ (३), लातूर-५० (१), लातूर मनपा-८१(२), उस्मानाबाद-३०६ (६), बीड-२६३ (२), नांदेड-१०३ , नांदेड मनपा-८३, अकोला-४५ (१), अकोला मनपा-१५ (१), अमरावती-३०, अमरावती मनपा-८१, यवतमाळ-५८ (१०), बुलढाणा-७२, वाशिम-१३ , नागपूर-१८० (३), नागपूर मनपा-८१७ (२३), वर्धा-५९ (१), भंडारा-४३ (४), गोंदिया-३४ (१), चंद्रपूर-६१, चंद्रपूर मनपा-४, गडचिरोली-१३, इतर राज्य ९ (१).
आनंदाची बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शनिवार, रविवारची संचारबंदी कायमस्वरुपी बंद
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, ‘ राज्यात आज 13165 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9011 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 446881 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 160413 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.09% झाले आहे.’ अशी माहिती ट्विट करत दिली आहे.
मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल पण… शरद पवारांचा सीबीआयला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

