Share

पुढचा काँग्रेस पक्षाध्यक्ष गांधी घराण्यातील नको: प्रियांका गांधी-वाड्रा

Published On: 

नवी दिल्ली : ‘काँग्रेसच्या अध्यक्षपदी यापुढे गांधी घराण्यातील व्यक्ती नको’ असे वक्तव्य काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केले होते. हे वक्तव्य प्रदीप छब्बर आणि हर्ष शाह या सोडन मिळून संपादन केलेल्या ‘इंडिया टुमारो : कन्व्हर्सेशन वुईथ द नेस्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकात लिहिले आहे. प्रियांका गांधी यांच्या प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमधील हे वक्तव्य या पुस्तकात छापण्यात आले आहे.

आता या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण सुटले असून काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र यावर जाहीर प्रतिक्रिया देणे टाळलेलंच दिसत आहे. प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीच फक्त समर्थन केले आहे. काँग्रेस पक्षामध्ये पुढील अध्यक्षपदावरून दोन गट पडले आहेत. ज्यातील एक गट हा राहुल गांधी यांनीच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करणारा आहे. तर, दुसरा गट हा गांधी घराणे सोडून इतर अध्यक्ष करावा या विचारांचा आहे . हा दुसरा गट आपले मत जाहीरपणे प्रकट करू शकत नाही.

राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दहा हजार पारच! तर कोरोनामुक्तांची टक्केवारी झाली तब्बल ‘इतकी’

त्यामुळेच आता या पुस्तकातील प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यामुळे, त्यांचा राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरून विरोध असल्याच्या कुजबुजी सुरु झाल्या आहेत. या पुस्तकात प्रियांका गांधी यांच्या सोबतच राहुल गांधी, अखिलेश यादव, स्मृती इराणी आदी नेत्यांच्या मुलाखती देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळ आता संपला असून देशातील मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या काँग्रेसची सूत्रे कोणाच्या हाती जाणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

‘पक्षासाठी लढा देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी नेतृत्वपदाची गरज नाही’

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!