औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शहरात आले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला होता. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे. मराठवाडा आणि औरंगाबाद शहरातील अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. ते सोडवण्यात आलेले नाहीत. मात्र, या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केला आहे.
या संदर्भात दाशरथे यांनी औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी औरंगाबाद शहरातील विविध समस्यांचा पाढा वाचला. या सर्व समस्या सोडवण्यात मनपातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले आहेत. शहरातील जनतेसमोर ते उघड होवू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा करत चर्चा घडवून आणली असल्याचा आरोपही दाशरथे यांनी केला आहे.
जायकवाडी धरण भरलेले असतानाही शहराला सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही. शहरातील नेत्यांची टँकर लॉबी त्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोपही दाशरथे यांनी केला आहे. औरंगाबादला मंजूर झालेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हस्तांतरीत केल्याच्या मुद्यावरुन देखील त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी भावी म्हणून उल्लेख करताच भाजप नेत्यांनाही सत्तेच्या स्वप्नांच्या उकळ्या फुटल्या, अशी टीकाही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता


