Share

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला झाला कोरोना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतातून पळून गेलेला पळपुटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बायको महजबीन या दोघांच्याही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर त्या दोघांनाही कराचीतल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे.

आनंदाची बातमी : UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर  

दाऊद आणि त्याच्या बायकोला प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली आणि नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दाऊदला करोना झाल्यामुळे संभ्रमात पडले असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते.

दाऊद आणि त्याच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे त्याची तब्ब्येत देखील बिघडली असल्याची माहिती आहे.

कमाईमध्ये घसरण होऊन देखील अक्षयने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव

पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. दरम्यान,1993च्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर असून तो सगळ्यांनाच गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!