मुंबई : काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एक भाष्य केले होते. मंचावर भाषण देताना पाटील यांनी, ‘तुमच्या इतकी चांगली हिंदी नाहीय माझी असं म्हणत जयंत पाटलांनी भाषणाला सुरुवात केली. पुढे त्यांनी सांगताना पुराचं वर्णन केलं. आपण जिथे हा कार्यक्रम घेतोय तिथून थोडं पुढे गेल्यानंतर जी गावं लागतात ती सर्व पाण्यात बुडाली होती. आपण बसलोय ते गावही पाण्याखाली होतं,’ असं राज्यपालांना उद्देशून म्हणाले होते.
त्यावर राज्यपाल म्हणाले कि ‘मी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यानंतर इथे आपत्ती वाढल्या आहेत. महापूर येत आहेत, असा समज तुम्ही करून घेऊ नका. मी उत्तराखंडहून आलो आहे, त्या भागात महापूर नेहमीच येत असतात. त्यामुळे मी येताना महापूर घेऊन आलोय आणि मी गेल्याशिवाय महापूर थांबणार नाही, असे तुम्ही काही समजू नका.’ असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.
राज्यपालांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना यांसदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, ‘ते काही बोलले असतील तर मला तुमच्याकडूनच कळतंय. पण ते राज्यात चांगले रमले होते. राजभवनात रमले होते. अनेक काम करताना ते पक्ष कार्यही चांगलं करत होते. त्यांचं आणि इथल्या भाजपाचं चांगलं जुळलं होतं. जायचं असेल तर जाता जाता १२ आमदारांच्या फाइलवर सही करुन जा. थोडं पुण्य आपल्या पदरी पडेल,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकार आघाडीच्या शिकारी झालंय म्हणून महिला आयोगाची स्थापना झाली नाही’
- ‘मुख्यमंत्री कारवाई करणार की घरातच बसून फेसबूक लाईव्ह करणार आहेत?’
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत कार्यकर्त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणेंना खांद्यावर घेतले!
- संजय राऊतांची महत्त्वाची घोषणा! ‘गोवा, युपीतही महाविकास आघाडीचा प्रयोग’
- विजय रुपानीनंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपा विधिमंडळ पक्षाची आज बैठक

