मुंबई : साकीनाका येथील मन सुन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने काल या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेनंतर राज्यात महिला आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरुन महिला आयोगाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. पीडितेच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. राज्य सरकार आघाडीच्या राजकारणाची शिकार झाली आहे. त्यामुळेच राज्यात महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही, अशी टीका राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी केली आहे.
महिला आयोग हा महिलांशी संबंधित आयोग असून हा संवेदनशील मुद्दा आहे. लवकर आयोग स्थापन करायला हवा. राज्य सरकार आपल्या आघाडीच्या राजकारणाच्या शिकारी झाले आहे. त्यामुळेच त्यांना महिला आयोगाच्या स्थापनेत इंटरेस्ट नाही. या संस्थांचं पुनर्गठन करावं, त्यात सदस्य नियुक्त करावेत यामध्ये सरकारला काडीचा रस नसल्याची टीका चंद्रमुखी देवी यांनी केली आहे.
दरम्यान, चंद्रमुखी देवी यांचे एक पथक मुंबईतील साकीनाका परिसरात पोहचले असून त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘२ तारखेपासून शिवसेनेचे मंत्री अनिल परबांचे अवैध कार्यालय जमीनदोस्त होणार’, किरीट सोमय्यांचा दावा
- ‘मुख्यमंत्री कारवाई करणार की घरातच बसून फेसबूक लाईव्ह करणार आहेत?’
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत कार्यकर्त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणेंना खांद्यावर घेतले!
- संजय राऊतांची महत्त्वाची घोषणा! ‘गोवा, युपीतही महाविकास आघाडीचा प्रयोग’
- विजय रुपानीनंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण? भाजपा विधिमंडळ पक्षाची आज बैठक

