Share

आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Published On: 

मुंबई : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९० (मुंबई ५८, ठाणे १०, उल्हासनगर ६, वसई विरार १, भिवंडी ३, मीरा-भाईंदर ५, पालघर १), नाशिक- ७ (नाशिक ५, मालेगाव २), पुणे- १७ (पुणे १०, सातारा ५, सोलापूर २), औरंगाबाद-२ (औरंगाबाद मनपा २), अकोला-४ (अकोला मनपा २, अमरावती २)

आता ठरणार कोरोना चाचण्यांचे दर, खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांचे दर निश्चितीसाठी समिती गठीत

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहेत. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये (५७.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३ , मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३, ठाणे -९, उल्हासनगर -६, नवी मुंबई -६ , सातारा- २ , वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१ , सोलापूर १ असे मृत्यू आहेत.

खबरदार हलगर्जीपणा केला तर, अजितदादांनी खासगी रुग्णालयांना भरला दम

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!