जयपूर : कोरोना व्हायरसची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्यामते या व्हायरसमुळे आतापर्यंत 5,00,108 लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा एक कोटीच्या वर गेला आहे. कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहेजनजागृतीसाठी सरकारने विविध उपाय केले. मात्र आता यातीलच एका उपायावर आता आक्षेप घेतले जात आहेत.
धक्कादायक : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण
आधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आता काँग्रेसच्या एका आमदाराने कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारतर्फे ऐकवण्यात येत असलेल्या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेतला आहे. भरत सिंह यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून फोनमध्ये ऐकू येणारी कोरोना व्हायरसची जनजागृती करणारी कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे.
मार्च महिन्यात ही ट्यून सुरू करण्यात आली. आणि आता तर जून महिना आला आहे. ज्यांना ही ट्यून ऐकायची आहे, आणि समजायचे आहे ते आतापर्यंत समजले असतील. आता यापुढेही ही ट्यून सुरू ठेवू नये. ही ट्यून ऐकून आता कान कंटाळले आहेत असं भरत सिंह यांनी म्हटलं आहे.
‘मागील तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,’ अशी मागणी आंबेडकर यांनी नुकतीच केली आहे.
कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते, टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झालं नव्हतं. कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे अनेक जण उपाशी आहेत, रोजगार बंद आहेत. सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे, 3 महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
बापरे… ‘या’ अभिनेत्री तब्बल ३६ हजारांचं वीज बिल, ट्विट करत व्यक्त केला संताप
‘लोकांचं आयुष्य सरकारनं उद्ध्वस्त केलंय. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रोगी झाले आहेत. आरोग्य यंत्रणेमुळं अनेकांचा जीव वाचत आहेत, लॉकडाऊनमुळे नाही,’ असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘यापुढं कुठल्याही तारखेची वाट न बघता सर्वांनी नेहमीसारखं जीवन जगायला सुरुवात करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

