Share

औरंगाबादेतील या हॉटेलमधील संपूर्ण स्टाफ कोरोना निगेटिव्ह; मात्र..

Published On: 

औरंगाबाद : इंग्लंड करून आलेला कुटुंबातील एक व्यक्ती मुंबई येथे पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर कुटुंबातील उर्वरित सदस्य औरंगाबाद येथे आले. मात्र आलेला सदस्यांपैकी आणखी एक सदस्य औरंगाबादेत हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्यानंतर पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे हॉटेलमधील सर्व स्टाफची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यात दिलासादायक बाब म्हणजे हॉटेलमधील सर्व स्टाफचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र आणखी ७ दिवसांनंतर पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. तसेच ओमायक्रॉन संशयित रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे तोपर्यंत शहरावर चिंतेचे सावट कायम आहे.

कोरोनानंतर आलेले नवे संकट म्हणजे ओमायक्रॉन. ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबादच्या रुग्णाचा समावेश असल्याने औरंगाबाद प्रशासन खडबडून जागे झाले असून शहरांमध्ये रहिवासी राहत असलेल्या भागातील रहिवाशांना सदर रुग्णाच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली. औरंगाबादेतील एक व्यक्ती मुंबईत ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यानंतर इंग्लंड वरून आलेल्या कुटुंबातील एक सदस्य मुंबई या ठिकाणी उपचार घेत आहे.

तर याच कुटुंबातील एका व्यक्तीच्या ओमायक्रॉनच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा केली जात आहे. हा व्यक्ती ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेल मधील २० कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. मात्र प्रथमदर्शनी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आलेले आहेत. मात्र पुन्हा एकदा सात दिवसानंतर संपूर्ण स्टाफची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल. मात्र अजूनपर्यंत औरंगाबादकरांना पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही. कारण ओमायक्रोनग्रस्त तरुणीच्या वडिलांचा रिपोर्ट काय येतो त्यानंतरच औरंगाबाद प्रशासनाचा जीव भांड्यात पडेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!