नंदुरबार- कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य माणूस काटेकोरपणे नियम पाळत असताना काही राजकीय नेते मंडळी शासनाने सांगितेले नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे.
नंदुरबारमधल्या काँग्रेस नगरसेवकाने आपल्या मुलाच्या लग्ना प्रित्यर्थ दिलेली जंगी पार्टी चांगलीच वादात सापडली आहे. या पार्टीतील स्वयंपाकीच कोरोना बाधित निघाल्याने एकचं खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्याने पार्टीला उपस्थिती लावणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांसह अनेक अधिकारी आणि प्रतिष्ठीत टेन्शनमध्ये आले आहेत.
आपल्या मुलाच्या लग्नाच्या पार्टीचे नंदुरबारचे काँग्रेस नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी आयोजन केले होते. मात्र या पार्टीतील स्वयंपाकीच कोरोना बाधित निघाल्याने त्या पार्टीत मजा लुटणाऱ्या लोकांना धक्का बसला आहे. या पार्टीत शेकडो लोकांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
हा १९६२चा नाही २०२०चा नवा भारत आहे, चीनला थेट धमकी
पहा, असं का म्हणाला सोनू सूद? ‘Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो’
विधानपरिषद निवडणूक: राजू शेट्टी आमदार व्हा, शरद पवारांची खुली ऑफर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

