Share

मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री आणि पवारांना दौरा करावा लागला; दरेकरांचा दावा

Published On: 

मुंबई : मागील आठवड्यात आलेल्या निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीलगतच्या गावांचं, शेतीचं किती नुकसान झालं आहे. या वादळाने नुकसान केलेल्या भागाचे आता विविध पक्षाचे नेते दौरे काढत आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील कोकण दौऱ्यावर आहेत.मात्र आता पवारांच्या या दौऱ्यावर भाजपने निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा, म्हणाले…

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मी निसर्ग वादळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण दौरा केल्यामुळेच मुख्यमंत्री आणि पवारांना दौरा करावा लागला, असा दावा केला आहे. या भागात झालेल्या नुकसानीबद्दल मी आवाज उठवल्यानंतर सरकारला उशीरा शहाणपण आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि पवारांनी दौरा केला, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

वादळामध्ये म्हसळा,श्रीवर्धन,हरेश्वर,बोर्ली पंचतन,दिवेआगर सह संपूर्ण कोकणाचे अतोनात नुकसान झाले असून 25 कोटी आणि 100 कोटी अश्या तुटपुंज्या मदतीवर जिल्ह्यातील लोकांचे भागणार नाही. कोकणाच्या जनतेची थट्टा करून जनतेची फसवणूक करून कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे धंदे सोडून द्यावेत’असे दरेकर यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा – शरद पवार

निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांना भरीव आर्थिक मदतीची गरज असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय तोकड्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील लोकांची निराशा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात आणखी मदतीची घोषणा करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!